Ground Water Detection App : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आम्ही सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि मार्गदर्शक बातमी या ठिकाणी घेऊन आलो आहोत. अनेक शेतकऱ्यांना पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवते. त्याचबरोबर अनेक शेतकरी पानाड्याकडून कोठे जमिनीत पाणी आहे हे देखील शोधतात.
परंतु या पद्धतीत शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात यश मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांचा खूप मोठा पैसा वाया जातो. त्याच बरोबर वेळही वाया जातो. आणि शेतकऱ्याला पाहिजे तेवढे पाणी मिळत नाही. मात्र आता सरकारने जमिनीतील पाणी शोधण्याचे नवीन ॲप तयार केले आहे. याच्या माध्यमातून तुम्ही शेतातील किंवा घराच्या आजूबाजूतील जमिनीत पाणी शोधू शकता..
या ॲपचे नाव वॉटर डिटेक्टर आहे…
मित्रांनो, आपल्या राज्यात तसेच देशात अनेक वेळा दुष्काळ दृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर अनेक जिल्ह्यात मोठा कडाकाचा दुष्काळ देखील पडल्याचे चित्र आपल्याला समोर आले आहे. त्याचबरोबर यावर्षीही पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. यामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे..Ground water detection app
या नुकसानाची भरपाई होण्यासाठी शेतकरी बोरवेल घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आता बोअरवेल घेताना प्रश्न पडतो की पाणी लागणार का? अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आता नवीन अॅप्स उपलब्ध आहे. त्याची माहिती आपण पाहणार आहोत. आमच्या मदतीने आपण जमिनीतील पाणी शोधण्याचा प्रयत्न करता येईल.
अॅप कसे कार्य करते?
पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातील बदलांची माहिती गोळा करण्यासाठी अॅप तुमच्या फोनमधील सेन्सर वापरते. अॅप चुंबकीय बदलांवरून भूगर्भातील पाण्याचे प्रमाण आणि तापमानाचा अंदाज लावते. आता हा अंदाज 100% अचूक नाही, परंतु तरीही तो एक उत्तम मार्गदर्शक ठरू शकतो.
‘वॉटर डिटेक्टर अॅप’ सध्या अँड्रॉईड फोनवर उपलब्ध आहे. हे अॅप तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून मोफत डाउनलोड करू शकता.Ground water detection app