Loan For Building A House | शेतात घर बांधण्यासाठी सरकार 20 ते 50 लाख रुपये देणार

Loan For Building A House

Loan For Building A House : नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांना शेतीसाठी कमी व्याजदरात कर्ज दिले जाते. त्याचप्रमाणे आता देशातील एका मोठ्या सरकारी बँकेने शेतकऱ्यांसाठी विशेष योजना सुरू केली आहे. आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 20-50 लाख रुपये दिले जाणार आहेत. आणि तुम्ही या योजनेचा अर्ज खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून करू शकता.



स्टार किसान घर योजना

केंद्र आणि विविध राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहेत. त्याचबरोबर मित्रांनो अशाच एका योजनेअंतर्गत राजस्थान सरकारने शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी कर्ज देण्याची महत्वपूर्ण घोषणा केली आहे.Loan for building a house

बँक 50 लाखांपर्यंत गृहकर्ज देते

सहकारी ग्राम गृहनिर्माण योजनेंतर्गत राजस्थानमधील शेतकऱ्यांना घरे बांधण्यासाठी 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. एवढेच नाही तर जे शेतकरी गृहकर्जाची वेळेवर परतफेड करतात त्यांना व्याजावर 5 टक्के अनुदानही मिळणार आहे.

सरकारच्या योजनेची माहिती देताना प्रधान सचिव श्रेया गुहा म्हणाल्या की, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात घरे बांधण्यासाठी केंद्रीय सहकारी बँकांकडून 3 हप्त्यांमध्ये 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. त्याचबरोबर या योजनेतून शेतकऱ्यांनी कर्ज घेतले तर शेतकऱ्यांना 6 टक्के व्याज द्यावे लागणार आहे.

15 वर्षांच्या कालावधीत कर्जाची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांना कालावधी असणार आहे

बँकेने दिलेल्या माहितीनुसार, बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड ही शेतकऱ्यांना 15 वर्षाच्या कालावधीत करावी लागणार आहे. यासाठी मध्यवर्ती सहकारी बँकांच्या व्यवस्थापकीय संचालकांना 72 कोटींहून अधिक रकमेचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील लोकांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती.Loan for building a house





Post a Comment

Previous Post Next Post