ZP Yojana 2024 | परिषदेमार्फत कडबा कुट्टी, पाणबुडी मोटार, डिझेल इंजिन, रोटाव्हेटर आणि पेरणी यंत्रासाठी मिळणार 75% अनुदान

ZP Yojana 2024

ZP Yojana 2024: 2023-24 या वर्षासाठी जिल्हा परिषद सेस (DBT) योजनेद्वारे सर्वसाधारण लाभार्थ्यांना 50% अनुदानावर आणि महिला व अपंग लाभार्थ्यांना 75% अनुदानावर विविध साहित्याचे वाटप करण्यात येत आहे.

यामध्ये कडबा कुट्टी, 5 एचपी पाणबुडी मोटर, डिझेल इंजिन, रोटाव्हेटर, रोटरी टिलर/पॉवर टिलर, डबल पलटी नांगर, प्लांटर/कल्टिव्हेटर, थ्री पिस्टन स्प्रे पंप, बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप, ब्रश कटर, ताडपत्री, स्लरी फ्लर, ट्रॅप, ट्रिपल, यंत्रे या वस्तूचा समावेश होणार आहे.

या सर्व बाबींचे प्रस्ताव पंचायत समिती मार्फत मंजूर करण्यात येत असले तरी सदर प्रस्ताव लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांनी टपाल विभागाकडे सादर करावयाचे आहेत. त्याचबरोबर मित्रांनो अर्जदारांनी नोंद घ्यावी की अपूर्ण प्रस्ताव पंचायत समितीकडून स्वीकारले जाणार नाहीत.


हे साहित्य जिल्हा परिषदेच्या कृषी विभागांतर्गत उपलब्ध करून देण्यात येत असून अर्जाचा नमुना खाली दिला आहे. हा अर्ज खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. आणि तेथून तुम्हाला तो डाऊनलोड करायचा आहे आणि तपशील नीट भरून गटविकास अधिकारी पंचायत समितीकडे जमा करायचा आहे.ZP Yojana 2024


यामध्ये तुम्ही ज्या टूलची मागणी करत आहात त्याचे नाव लिहायचे आहे. नंतर तुमची वैयक्तिक माहिती लिहायची आहे. तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे. वैयक्तिक माहितीमध्ये अर्जदाराचे आडनाव, नाव, वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव समाविष्ट असावे. यानंतर रहिवासी पत्ता अचूक टाकावा लागेल


त्याच बरोबर अर्जामध्ये अर्जदार व्यक्ती महिला आहे की पुरुष याची संपूर्ण माहिती द्यायची आहे. तर तुम्ही अर्जदार कोणत्या श्रेणीचा आहात यावर टिक करा. तुम्हाला जोडायचा असलेला मोबाईल नंबर किंवा फोन नंबर. आधार कार्डशी लिंक केलेले अर्जदाराचे बँक खाते तपशील, आधार कार्ड क्रमांक, बँकेचे नाव, शाखेचा पत्ता, खाते क्रमांक, एफएससी कोड इत्यादी भरून पंचायत समितीकडे जमा करावे लागतील.ZP Yojana 2024






Post a Comment

Previous Post Next Post