SBI Mudra Loan | यांना मिळणार बिनव्याजी १० लाख रुपये कर्ज

SBI Mudra Loan

SBI Mudra Loan : केंद्र सरकार वेगवेगळ्या विभागांसाठी अनेक प्रकारच्या योजना आणत असते. त्यापैकीच एका योजनेची माहिती आज आपण पाहणार आहोत. अनेकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो, मात्र पैशांची अडचण येते. अशा परिस्थितीत, लोक बँकांकडे वळतात, परंतु कधीकधी अधिक कागदपत्रांच्या पूर्तता न झाल्यामुळं कर्ज मिळणं कठीण होतं. अशा परिस्थितीत देशात व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं प्रधानमंत्री मुद्रा योजना (Pradhan Mantri Mudra Yojana) सुरु केली आहे. या योजनेद्वारे तुम्ही कोणत्याही हमीशिवाय 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळवू शकता. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. पाहुयात या योजनेबद्दल सविस्तर माहिती.


प्रधानमंत्री मुद्रा योजनेबद्दल सविस्तर माहिती

केंद्र सरकारने 2015 मध्ये ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकारला 50,000 ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही हमीशिवाय द्यावे लागते. या कर्जामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रोसेसिंग शुल्क भरावे लागणार नाही. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांव्यतिरिक्त, हे लोक सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका (RRBs), लघु वित्त बँका आणि NBFC कडून देखील हे कर्ज मिळवू शकतात. या कर्जाचा व्याजदर वेगवेगळ्या बँकांकडून वेगवेगळा असतो. साधारणपणे बँका या कर्जावर 10 ते 12 टक्के व्याजदर आकारतात.


मुद्रा कर्जाचे तीन प्रकार आहेत

PM मुद्रा कर्जाचे एकूण तीन प्रकार आहेत. पहिली श्रेणी म्हणजे शिशु कर्ज. या अंतर्गत, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा तुमचा व्यवसाय सुरू करता, तेव्हा सरकार तुम्हाला 5 वर्षांसाठी कोणत्याही हमीशिवाय 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज देते. आधीच व्यवसाय करत असलेल्या लोकांनाही त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठीही कर्ज दिले जाते. जर तुम्ही 50,000 ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेतले तर ते किशोर कर्जाच्या श्रेणीत येते. तरुण कर्ज श्रेणी अंतर्गत, सरकार व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी 5 ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देते.



Post a Comment

Previous Post Next Post