महावितरणने सुरू केली नवीन योजना.! आता शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज

महावितरणने सुरू केली नवीन योजना.! आता शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज

नमस्कार शेतकरी मित्रांनो घरगुती ग्राहक आणि कृषी ग्राहकांच्या अडचणी कमी करण्यासाठी महावितरणने उपाययोजना केल्या आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत कृषी सिंचनासाठी दिवसा वीज देण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.

सुमारे 1 लाख 12 हजार कृषी ग्राहकांना दररोज सिंचनासाठी वीज मिळणार आहे.

योजनेसाठी जमीन संपादित करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात निवडक उपकेंद्रांच्या बळकटीकरणाचे काम सुरू झाले आहे.

शेतीसाठी रात्रीच्या वेळी कृषी पंपांना वीजपुरवठा केला जातो. तो दिवसाही सुरू करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे, त्यामुळेच महावितरणने सकारात्मक पावले उचलून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत दिवसा वीज पुरवठ्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील.


विशेष म्हणजे जिल्ह्यातील ४३ उपकेंद्रांमध्ये ७९५ एकर जागेवर १५९ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यामुळे दररोज सुमारे ६५ हजार कृषी ग्राहकांना वीज मिळणार आहे.

विशेष म्हणजे जिल्ह्यातील ४३ उपकेंद्रांमध्ये ७९५ एकर जागेवर १५९ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यामुळे दररोज सुमारे ६५ हजार कृषी ग्राहकांना वीज मिळणार आहे. सांगली जिल्ह्यातील 28 सबस्टेशनवर 1,153 एकर जागेवर 186 मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे दिवसभरात 59 हजार कृषी ग्राहकांना वीज मिळणार आहे.

वीजचोरीवर नियंत्रण.

कोल्हापूर परिमंडळात वीजचोरीच्या घटना कमी आहेत. वर्षभरात कोल्हापूर परिमंडळात वीजचोरीच्या १,२२९ प्रकरणात विद्युत कायदा, २००३ च्या कलम १३५ आणि १३८ अन्वये ३ कोटी ८५ लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यात 442 प्रकरणात एक हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.



Post a Comment

Previous Post Next Post