2022 Pikvima Update | कमी पिकविमा मिळालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा पिकविमा मंजूर

2022 Pikvima Update



2022 Pikvima Update ; कमी पिकविमा मिळालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा पिकविमा मंजूर, हे शेतकरी पात्र
(2022 Pikvima update) खरीप आणि रब्बी हंगाम 2022 मध्ये कमी पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. 2019 च्या शासन निर्णयानुसार, जर शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून 1000 पेक्षा कमी पीक विमा मिळाला असेल, तर फरकाची रक्कम राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाते.

शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पीकविमा कंपनीकडून 1000 पेक्षा कमी पीक विमा मिळतो, त्यांना उर्वरित फरकाची रक्कम राज्य शासनामार्फत दिली जाते. या पार्श्वभूमीवर 2022 च्या खरीप आणि रब्बी हंगामात 1000 पेक्षा कमी पीकविमा मिळालेल्या शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर करण्यात आला आहे..

2022 च्या खरीप हंगामात राज्यातील 75196 शेतकऱ्यांसाठी 29399316 (2 कोटी 93 लाख 99 हजार 316) रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.तर रब्बी हंगामात 9244 शेतकऱ्यांसाठी 4752267 (47 लाख 52 हजार 267) रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.(2022 Pikvima update)


2022 रब्बी पिकविमा – GR पहा
शेतकरी मित्रांनो तुम्ही 2022 मध्ये पीक विमा भरला होता का? किती रुपये भरले? कोणत्या पिकासाठी पीक विमा भरला? तुम्हाला किती पीक विमा मिळाला याची माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलवर तपासू शकता.जर तुम्हाला 2022 मध्ये 1000 पेक्षा कमी विमा मिळाला आसेल तर फरकाची रक्कम तुम्हाला मिळनार आहे.



★ चेक करन्यासाठी सर्वप्रथम pmfby वेबसाइटला भेट द्या https://pmfby.gov.in/

★ नंतर Farmer corner पर्यायावर क्लिक करा आणि लॉगिन शेतकरी वर क्लिक करा..

★ नंतर मोबाईल नंबर आणि कॅप टाईप करा आणि विनंती otp वर क्लिक करा.
(तुमच्या मोबाईल नंबरवरून एकापेक्षा जास्त पिक विमा अर्ज नोंदणीकृत असल्यास तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल.)

★ त्यानंतर ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला मिळेल आणि सबमिट करा..

★ मग तुम्ही वर्ष आणि हंगाम निवडा…

★ खालील रकान्यात तुम्हाला कोणता पीक विमा भरला आहे, अर्ज क्रमांक, किती रुपये भरले आहेत याची माहिती दिसेल.

★ त्यानंतर क्लेम डिटेल्सच्या पर्यायातील view वर क्लिक करून तुम्हाला किती पीक विमा मिळाला आहे याची माहिती तुम्ही पाहू शकता….प्रत्येक पिकासाठी किती पैसे मिळाले आहेत ते तुम्ही पाहू शकता.



Post a Comment

Previous Post Next Post