Board Exam Timetable : 10वी 12वी बोर्ड परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर वेळापत्रकात मोठे बदल
Board Exam Timetable : माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरु होत आहे. बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ ते २३ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे. तर, दहावीची लेखी परीक्षा ०१ मार्च २०२४ ते २२ मार्च २०२४ या कालवधीत होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने २८ ऑगस्ट २०२३ रोजी परिपत्रकाच्या (प्रकटन) माध्यमातून ही माहिती प्रसिद्ध करणायात आली आहे.
फेब्रुवारी – मार्च २०२४ मध्ये राज्याभरात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळाकडून दहावी व बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने बोर्डाच्या फेब्रुवारी- मार्च २०२४ परीक्षांचे हे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सदर, दहावी आणि बारावीच्या परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार आयोजित करण्यात येतील याची सर्व शाळा, महावियालये, विद्यार्थी आणि पालकांनाई नोंद घ्यावी असेही या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी असून, परीक्षेपूर्वी सर्व माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. मंडळाकडून देण्यात आलेल्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी,अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. शिवाय, इतर संकेतस्थळ,
अन्य यंत्रणांवरील छापील वेळापत्रक किंवा व्हॉट्स अॅपच्या Whatsapp च्या माध्यमातून व्हायरल होणारे वेळापत्रक ग्राही धरू नये अशा सूचनाही राज्य शिक्षण मंडळाच्यावतीने परिपत्रकात करण्यात आल्या आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.