ST Recruitment 2024 : एसटी महामंडळात भरती होण्यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे. त्याचबरोबर उमेदवाराला पगार किती मिळेल? अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे असे संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे.
या भरतीचा अर्ज हा ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करता येतो. आणि उमेदवार ऑनलाईन पद्धतीने सीएससी सेंटरवर अर्ज करू शकतात. त्याचबरोबर ही भरती प्रक्रिया सातारा या ठिकाणी घेण्यात येत आहे.
या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 जानेवारी 2024 आहे. अर्ज ऑफलाइन पाठवण्याचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे:- विभाग नियंत्रक कार्यालय, 7 स्टार बिल्डिंगच्या मागे, एसटी स्टँड जवळ, रविवार पेठ, सातारा- 415001 हे ठिकाण आहे.
त्याचबरोबर मित्रांनो, या भरतीमध्ये पात्र होणाऱ्या उमेदवाराला 8 हजार 50 ते 10 हजार रुपयांपर्यंत मानधन मिळू शकते.ST Recruitment 2024