Post Office Scheme : खात्रीशीर आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस हा एक चांगला पर्याय आहे. पोस्ट ऑफिस सामान्य नागरिकांसाठी छोट्या छोट्या, विविध बचत योजना राबवत असते. या लेखात आपण बघणार आहोत की, पती-पत्नीच्या जॉइंट अकाऊंट उघडून त्यातुन प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम मिळू शकते. पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम (POMIS) मध्ये गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतात. या योजनेमध्ये सिंगल किंवा जॉईंट अशा दोन्ही प्रकारे उघडता येतात. या योजनेच्या व्याजदरात 1 एप्रिल, 2023 पासून केंद्र सरकारने वाढ केली आहे. त्याचप्रमाणे गुंतवणुकीची मर्यादा देखील वाढवण्यात आली आहे.
ज्या दिवशी पैसे डिपॉझिट केले, त्यानंतर एक वर्षात तुम्ही तुमच्या खात्यातून पैसे काढू शकता. जर एक ते तीन वर्षांच्या काळात पैसे काढले, तर त्यावर तुम्हाला दोन टक्के शुल्क आकारले जाते. व त्यानंतर शुल्क वजा करून उरलेली रक्कम परत दिली जाते. तीन वर्षानंतर गुंतवणूक दाराने मुदतपूर्व खाते बंद केले, तर जमा केलेली जी काही रक्कम असेल, त्यावरती एक टक्का रक्कम वजा केली जाते. या योजनेमध्ये दोन किंवा तीन व्यक्ती या संयुक्त खाते ओपन करू शकतात. यामध्ये संयुक्त खात्याचे रूपांतर हे एका खात्यामध्ये करता येते. तसेच एका खात्याचे रूपांतर संयुक्त खात्यामध्येही करता येऊ शकते .
एक रकमी गुंतवणुकीवर मिळतो चांगला परतावा
या योजनेअंतर्गत एका खात्यात गुंतवणूकदार post office scheme जास्तीत जास्त नऊ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतो. संयुक्त खात्याची मर्यादा सरकारने वाढवली आहे. ही मर्यादा आता पंधरा लाख रुपये करण्यात आलेली आहे. मॅच्युरिटी नंतर गुंतवणूकदार गुंतवणूक केलेली रक्कम काढू शकतो. किंवा या योजनेचा कालावधी पाच पाच वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकतो.