Pipeline Kayda in Marathi शेतकरी बांधवांनो अनेक वेळा आपल्याला शेतीला पाणी नेण्यासाठी दुसऱ्याच्या शेतातून आपल्या शेतात घेऊन जावं लागतं.
अशावेळी तुम्हाला जर समोरच्या शेतकरी पाईपलाईन टाकण्यासाठी विरोध करत असेल तर तुम्हाला त्यासाठी कुठे अर्ज करावा लागतो ?.
कायद्याची तुम्हाला मदत मिळते याची थोडक्यात माहिती जाणून घेऊया. समोरचा व्यक्ती पाईपलाईन करू देत नसेल तर त्यासाठी अर्ज कुठे करावा लागतो?
याची माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पाईपलाईन साठी विरोध होत असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं तर कायद्याचा आधार तुम्हाला घ्यावा लागतो.
Pipeline Kayda in Marathi
पाईपलाईन साठी विरोध केला तर त्यांचे विरोधात तुम्हाला तक्रार देखील करता येते. हा कायदा नेमकी काय आहे हे थोडक्यात आपण पाहण्याचा प्रयत्न करूया.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 या कायद्याअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना पाईपलाईन, पाट, जलमार्ग बांधण्यासंबंधीचे अधिकार आहेत.
यामुळे तुम्हाला कोणीही जे काही पाईपलाईन असेल किंवा पाट असेल तर याला अडवू शकत नाही. असा अधिकार जो काही हा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 या कायद्यामध्ये
तुम्हाला पाहायला मिळतो. एखादा शेतकरी विरोध दाखवत असेल तर तुम्ही थेट तहसीलदारांकडे अर्ज करू शकता. त्यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 49 नुसार तुम्हाला अर्ज करता येतो.
तहसीलदाराकडे अर्ज करताना तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता लागते. त्यानंतर तुम्हाला विहित नमुन्यातील अर्ज देखील भरावा लागतो.
यासाठी तुम्हाला जमिनीचा नकाशा, पाईपलाईनचा संपूर्ण आराखडा, सातबारा उतारा, अर्ज भरताना सादर करावा लागणार आहे. जो शेतकरी पाईपलाईन साठी विरोध करत आहे,
त्यांचे नाव आणि त्याचा गट नंबर देखील तुम्हाला त्यात टाकावा लागतो.. आणि तहसील कार्यालयात तुम्ही अर्ज केल्यावर तहसीलदारच्या माध्यमातून सदर शेतकऱ्याला समजूत दिली जाते.
त्यानंतर तुमचा पाईपलाईन करण्याचा मार्ग मोकळा होतो. मात्र पाईपलाईन करताना संबंधित शेतकऱ्याचे कमीत कमी नुकसान होईल, याची काळजी पाईपलाईन करणाऱ्या शेतकऱ्यांन
ी
घेणे अपेक्षित असते. अशा पद्धतीचे एक महत्त्वपूर्ण अपडेट होतं जे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. महत्त्वाच्या बातम्या साठी आपल्या वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद…..