Board Exam | दहावी बारावीचा निकाल या तारखेला लागणार

Board Exam

Board Exam दहावी, बारावीच्या विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी! शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय

सागर आव्हाड, झी मीडिया पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (SSC-HSC Exam 2023) फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी-बारावाच्या परीक्षा होणार आहेत. 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान बारावीची परीक्षा होणार आहे तर दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्चदरम्यान जाणार आहे. राज्य शिक्षण मंडळाने (Maharashtra State Board) यासाठी पूर्ण तयारी केली आहे. यावेळी Board Exam दहावी आणि बारावीच्या परीक्षांदरम्यान होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य शिक्षण मंडळातर्फे कृती कार्यक्रम तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्याकडून 20 जानेवारीपर्यंत ऑनलाइन पद्धतीने कृती कार्यक्रमासाठी सूचना मागवण्यात आल्या आहेत.




Post a Comment

Previous Post Next Post