T20 World Cup Match | टी 20 वर्ल्ड कप चे नवीन वेळापत्रक झाले जाहीर

T20 World Cup Match

T20 World Cup Match : यावर्षी जूनमध्ये होणाऱ्या ICC T20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वेस्ट इंडिज आणि यूएसए मधील एकूण 9 मैदानांवर 2024 च्या T20 विश्वचषकात एकूण 55 सामने खेळवले जाणार आहेत. T20 विश्वचषक 2024 चा सलामीचा सामना 1 जून रोजी यजमान यूएसए आणि कॅनडा यांच्यात होणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 26 आणि 27 जून रोजी होणार आहेत. 29 जून रोजी बार्बाडोस येथे अंतिम सामना होणार आहे.


या दिवशी भारत-पाकिस्तान भिडणार.

भारतीय संघाला अ गटात आयर्लंड, पाकिस्तान, अमेरिका आणि t20 world cup match कॅनडासोबत ठेवण्यात आले आहे. भारतीय संघाचे पहिले तीन गट सामने न्यूयॉर्कमध्ये होणार आहेत. भारतीय संघ 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. दुसरा सामना 9 जून रोजी पाकिस्तानशी होणार आहे. तर भारतीय संघ 12 जून रोजी अमेरिकेविरुद्ध तिसरा गट सामना खेळणार आहे. भारताचा शेवटचा गट सामना 15 जून रोजी कॅनडाविरुद्ध होणार आहे.




Post a Comment

Previous Post Next Post