Sanman Dhan Yojana Maharashtra | नवीन सन्मान धन योजना सुरु

Sanman Dhan Yojana Maharashtra

Sanman Dhan Yojana Maharashtra : सन्मान धन योजना अंतर्गत कामगारांना प्रत्येक वर्षी 10,000 रुपये दिले जाणार आहेत तर यासाठी कोणते कामगार पात्र आहेत कोण लाभ घेऊ शकत, यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित केला असून या जीआर मधून आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळांतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजना अंतर्गत द्यावयाच्या आर्थिक सहाय्याबाबत शासनेन आज मान्यता दिली आहे.



महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करिता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम, २००८ च्या कलम ११ मध्ये “वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या परंतु ६० वर्ष पूर्ण केलेली नसतील,” अशी घरेलू कामगारांची वयोमर्यादा विहित केली आहे. तरी, सद्यःस्थितीत शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, दिनांक ८ ऑगस्ट २०१४, दि.०५.०१.२०२३ व दि.२५.०३.२०२३ अन्वये राबविण्यात आलेल्या सन्मानधन योजनेच्या धर्तीवर घरेलू कामगारांच्या सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सुधारित स्वरुपात सन्मान धन योजना, २०२२ राबविण्यासाठी प्रतिवर्षी दिनांक ३१ डिसेंबर रोजी वयाची ५५ वर्ष पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जिवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना सन्मानधन योजना अंतर्गत लाभ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.



महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्ष पूर्ण केलेल्या जिवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना Sanman Dhan Yojana महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजना अंतर्गत रूपये 10,000/- एवढी रक्कम खालील अटींच्या अधिन राहून थेट त्यांच्या बँक खात्यात डिबीटीव्दारे जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.



Post a Comment

Previous Post Next Post