Land Record: महाराष्ट्रातही बनावट सातबारा वापरून कर्ज घेतल्याचे प्रकार घडले असून नंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन महिन्यांपूर्वी असाच प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात उघडकीस आला होता. यामुळे तुमचा सातबारा बनावट आहे की खरा हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
श्रीगोंदे तालुक्यातील पिसोर बुद्रुक गावातील 7 जणांनी बँकेचे 10 लाखांचे कर्ज घेऊन फसवणुकीचा कट रचला. याप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय जमिनीचे व्यवहार करताना बनावट सातबारा उतारा दाखवून फसवणूक केली जाते, त्यामुळे सातबारा उतार्याच्या आधारे व्यवहार करताना तो उतारा बरोबर की चूक, हे तपासणे आवश्यक असते.
जमिनीचा सातबारा बोगस आहे की खरा हे सिद्ध करण्यासाठी खालील गोष्टीची पूर्तता असावी…
1. तलाठ्याची सही
सातबारा उताऱ्यावर तलाठ्याची स्वाक्षरी असते. तुम्ही करत असलेल्या व्यवहारात सातबारा उतारा सादर केला असेल, त्यावर तलाठ्याची स्वाक्षरी नसेल, तर सातबारा बनावट आहे. सरकारने गेल्या काही वर्षांत डिजिटल स्वाक्षरी उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.
2. QR कोड
सातबारा उताऱ्यातील नव्या बदलानुसार, सातबारा उताऱ्यावर किंवा आर कोड दिलेला असतो. मित्रांनो तुम्ही जर एखाद्या जमिनीचा व्यवहार करत असाल तर त्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर हा क्यू आर कोड नसेल तर तो सातबारा बोगस आहे असे समजा.Land record
3. LED कोड आणि महाभुमी प्रकल्पाचा लोगो
मित्रांनो, फसवणुकीचे व्यवहार वाढत असल्यामुळे सातबारा उताऱ्यावर सातत्याने बदल करण्यात येत आहेत. आत्ताच सातबारा उतारावरील नवीन बदलानुसार आता सातबारा उताऱ्यावर शेतजमिनीच्या माहिती सोबतच गावाचा युनिक कोड क्रमांक नमूद केलेला असतो.
यामुळे सरकारच्या नवीन नियमानुसार, ज्या सातबारा उताऱ्यावर हा कोड नमूद केलेला नाही तोच सातबारा उतारा बोगस आहे. यामुळे तुम्ही हा कोड देखील लक्षपूर्वक चेक करा.
तसेच, 3 मार्च 2020 रोजी, महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र शासनाचा लोगो आणि ई-महाभूमी प्रकल्पाला सातबारा आणि आठ-अ उताऱ्यावर वरच्या बाजूला महाराष्ट्र शासनाचे हे लोगो असतील.
हे दोन लोगो प्रत्येक डिजिटल सातबारा उताऱ्यामध्ये असतात. परंतु, तुमच्या डिजिटल सातबारा उताऱ्याच्या प्रिंट आऊटमध्ये हे दोन लोगो नसतील, तर तो सातबारा बनावट आहे, असे समजावे.Land record