Gpay App Update 2024 : या तारखेपासून google pay बंद होणार, काय आहे कारण जाणून घ्या
gpay app update 2024 : भारतात डिजीटल पेमेंट करणाऱ्यांची संख्या जगात सर्वाधिक आहेत. करोडो लोकं भारतात आता गुगल पे हे अॅप वापरतात. गुगल पे च्या माध्यमातून लोकं सहज पैसे पाठवतात. पण आता गुगल पे हे बंद होणार आहे. कंपनीने असा निर्णय का घेतला आणि काय आहे कारण जाणून घ्या.
भारतात आता गुगल पे हे करोडो लोकं वापरत आहेत. अनेकांना १० रुपये जरी द्यायचे असतील तरी ते लोकं गुगल पेचा वापर करतात. त्यामुळे भारतात डिजीटल पेमेंट करण्यांऱ्याची संख्या झपाट्याने वाढली आहे. जगातील सर्वात जास्त डिजीटल पेमेंट हे भारतात केले जात आहेत. त्यामुळेच
गुगल पे आणि इतर डिजीटल कंपन्यांचे महत्त्व वाढले आहे. पण असं असतानाच एका देशात मात्र गुगल पे बंद होणार आहे. कोणता आहे तो देश आणि का होतंय त्या देशात गुगल पे बंद जाणून घ्या.gpay app update 2024
Google ने घोषणा केली आहे की ते 4 जून 2024 पासून अमेरिकेमध्ये Google Pay ॲप बंद करत आहे. Google Wallet प्लॅटफॉर्मवर त्यांना आता Google ची पेमेंट ऑफर आणायची आहे. म्हणजेच आता गुगल पेचे जुने व्हर्जन बंद होणार आहे.
gpay app update 2024
हे ॲप बंद केल्याने पीअर-टू-पीअर पेमेंटही बंद होणार आहे. याआधी फक्त त्याच्या मदतीने अमेरिकेत पैसे पाठवू किंवा मागवू शकत होते. अमेरिकेतील लोकं ते अधिक वापरत होते. त्यामुळे तुम्हाला जर अमेरिकेत कोणाला पैसे पाठवायचे किंवा मागवायचे असतील तर ते शक्य होणार नाहीये.
कंपनी Google Pay युजर्सला Google Wallet ॲपवर जाण्याचा सल्ला देत आहे. यात व्हर्च्युअल डेबिट सारखी वैशिष्ट्ये आहेत. युजर त्यांच्या खात्यात राहिलेले पैसे पाहू शकतील आणि बँक खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित करण्याची सुविधा Google Pay वेबसाइटद्वारे उपलब्ध असेल.