Government Scheme For Farmers: नमस्कार शेतकरी मित्रांनो, मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे. त्याचबरोबर नवनवीन योजना देखील सरकार राज्यात राबवत आहे. या योजनांचा फायदा देखील शेतकरी घेत आहेत.
महाराष्ट्र मध्ये ऊस लागवडीचे क्षेत्र आहे भरपूर प्रमाणात आहे. त्याचबरोबर ऊस तोडणी करण्यासाठी रोजगार कमी पडत असलेले तज्ञ वेगवेगळ्या मशिनरीच्या सहाय्याने ऊस तोडणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच आता नवीन निघालेले ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्यासाठी महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकार वस तोडणी यंत्रावर काही अनुदान देणार आहे.
राज्यात ऊस लागवडीखालील भरपूर प्रमाणात असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जर वर्षी ऊस तोडणीसाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तरी देशील काही शेतकऱ्यांचा ऊस तोडणी होत नाही. यामुळे त्या शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्याचबरोबर अलीकडच्या काळात मजूर टंचाई देखील खूपच वाढले आहे.
मजूर टंचाईवर मात करण्यासाठी यांत्रिकीकरणाचा वापर सुरू करण्यात आला आहे. यामुळे आता अनेक भागात ऊस तोडण्यासाठी यंत्राची वापर केला जात आहे. परंतु हे ऊस तोडणी यंत्र कमी पैशात मिळत नाहीत यासाठी भरपूर पैसे लागतात. यामुळे या यंत्रासाठी शासनापुढे अनुदानाची आवश्यकता आहे. या हेतूने सरकारने आता राज्यातल्या शेतकऱ्यांना ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेसाठी 192 कोटी 78 लाख रुपये मंजूर केले आहेत. या निधीची मंजुरी कृषी विकास योजनेतून करण्यात आले आहे.Government scheme for farmers
शेतकरी मित्रांनो, या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाचा 128 कोटीचा राज्य हिस्सा आहे. म्हणजेच आता शेतकऱ्यांना या योजनेसाठी तब्बल 320 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आले आहे. त्याचबरोबर हा निधी पुढील दोन वर्षाच्या कालावधीसाठी उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर या योजनेच्या साह्याने आपल्या महाराष्ट्र राज्यात जवळपास नऊशे ऊस तोडणी यंत्र उपलब्ध करण्याचा हेतू आहे.
या योजनेअंतर्गत शासनाकडून वैयक्तिक शेतकरी, उद्योजक आणि त्याचबरोबर साखर कारखान्याला लाभ दिला जाणार आहे. या ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेसाठी महाराष्ट्रातून केंद्रात जाणारे नितीन गडकरी यांचे मोलाचे सहकार्य आहे. त्यांनी ही योजना अमलात आणण्यासाठी भरपूर प्रयत्न केले आहेत. यांच्यामुळेच ही योजना महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येत आहे असे म्हणता येईल.
त्याचबरोबर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या योजनेसाठी अनेक प्रयत्न केले आहेत. मजूरटंचाई पाहून महाराष्ट्रातील सरकारने ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमुळे अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर सद्यस्थितीत आपल्या महाराष्ट्रात हे ऊस तोडणी यंत्र 800 ते 925 आहेत.
त्याचबरोबर आता सरकार कडून ऊस तोडणी यंत्र साठी 320 कोटीचे अनुदान मिळणार आहे. या अनुदानामध्ये तब्बल 900 ऊस तोडणी यंत्र शेतकऱ्यांना खरेदी करता येणार आहेत. यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आता तब्बल 1700 पेक्षा जास्त ऊस तोडणी यंत्र उपलब्ध असणार आहेत. या ऊस तोडणी यंत्र मुळे महाराष्ट्रामध्ये मजूरटंचाई नक्कीच कमी होणार आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचा फायदा होईल त्याचबरोबर साखर कारखाना देखील आणखी वेगाने चालेल.
या ऊस तोडणी यंत्राची किंमत जवळपास 90 लाख रुपये आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी या यंत्राची किंमत एक कोटी पर्यंत जाते. एवढी मोठी रक्कम शेतकऱ्यांनी एका हाताने देणे हे शेतकऱ्यांना परवडत नव्हते. यामुळे सरकारने सरकारने या योजनेसाठी अनुदान जाहीर केले आहे. शासनाकडून हे यंत्र खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना 35 टक्के एवढे अनुदान देणे अपेक्षित आहे. म्हणजेच अंदाजानुसार शासनाने 35 लाखाचे अनुदान संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना दिले पाहिजे. या योजनेची अजून अंतिम स्वरूप स्पष्ट झालेले नाही. परंतु या महिना अखेर ही योजना राज्यामध्ये कशी राबवली जाणार आहे. याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर होणार आहेत.Government scheme for farmers