Dushkal 2024 | दुष्काळ अनुदानासाठी या जिल्ह्यातील ३२ हजार शेतकरी पात्र ३५ कोटी निधी मंजूर

Dushkal 2024

Dushkal 2024 दुष्काळ अनुदानासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील ३२ हजार शेतकरी पात्र ठरले आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ३५ कोटी ८१ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदानाचा लाभ मिळणार आहे. dushkal 2024

सोयगाव तालुक्यातील अतिगंभीर दुष्काळाच्या अनुदानाला अखेर महूर्त मिळाला आहे तालुक्यातील चारही महसूल मंडळातील ३२ हजार २९८ शेतकरी या अनुदानासाठी पात्र ठरले आहे.


1 मार्च पासून या बाधित शेतकऱ्यांच्या याद्या करण्याचे काम महसूल प्रशासनाने हाती घेतले आहे लवकरच हि रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली आहे.

ओक्टोंबर महिन्यात दुष्काळाची घोषणा केल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी दुष्काळाच्या अनुदानाला महूर्त मिळाला आहे

त्यासाठी ४० हजार ५८५ हेक्टरवरील ३२ हजार २९८ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना निधी प्राप्त झाला आहे त्यामुळे निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दुष्काळ अनुदानाची रक्कम जमा होणार असल्याची शक्यता आहे.


तीन हेक्टरपर्यंत मिळणार आर्थिक मदत
खरीप हंगाम २०२३ च्या दुष्काळासाठी वाढीव क्षेत्राच्या निर्णयानुसार 3 हेक्टरपर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे मात्र यावरील पिकाचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान होणे आवश्यक आहे.

सोयगाव तालुक्यात दुष्काळात ४० हजार ५८५ हेक्टर वरील पिकाचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अहवाल याआधीच शासनाकडे सादर केला आहे.

त्यामुळे तालुक्यातील ३५ कोटी ८१ लाख ३८ हजार 200 एवढा निधी मंजूर झाला आहे.




Post a Comment

Previous Post Next Post