मोठी बातमी! | कर्जमाफी योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या नवीन याद्या जाहीर



मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महात्मा फुले कर्जमाफी योजनेत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली होती.

आतापर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावाच्या तीन याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चौथ्या यादीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

31 मार्च 2023 पूर्वी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 50 हजार रुपये थेट जमा केले जातील,

असे सांगण्यात आले आहे. या यादीमध्ये राज्यातील मृत्यू झालेल्या पात्र लाभार्थ्यांच्या नावांचा समावेश आहे.


तसेच पात्र शेतकऱ्यांची एकापेक्षा जास्त कर्ज खाती असलेल्या शेतकऱ्यांची नावेही चौथ्या यादीत समाविष्ट आहेत.

चौथ्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांसाठी आधार पडताळणी (केवायसी) अनिवार्य आहे.

अन्यथा प्रोत्साहनपर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करून घेणे आवश्यक आहे.

पात्र लाभार्थी mjpsky च्या पोर्टलवर ही यादी तपासू शकतात. यासाठी तुम्ही जवळच्या CSC केंद्रावर जाऊन ही यादी पाहू शकता.


ही यादी मोबाईलवरूनही पाहता येईल. mjpsky पोर्टलवर लॉग इन करून शेतकरी यादीतील त्यांचे नाव तपासू शकतात.

दरम्यान, 27 जुलै 2022 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती.



Post a Comment

Previous Post Next Post