Bank Of Maharashtra New Rules
Bank of Maharashtra new rules | बँक ऑफ महाराष्टाच्या ग्राहकांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. बँकेच्या या निर्णयामुळे ग्राहकांना आता अधिक पैसा मोजावा लागणार असून त्यांच्या मासिक खर्चात देखील त्यामुळे मोठी वाढ होणार आहे.जर तुम्ही या सरकारी बँकेकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले असेल, मग ते एक महिना असो किंवा 1 वर्ष, तुम्हाला आता जास्त ईएमआय भरावा लागेल कारण बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडबेस्ड लेंडिंग रेट (एमसीएलआर) वाढवला आहे. Bank of Maharashtra new rules
Bank of Maharashtra new rules बँक ऑफ महाराष्ट्रने एमसीएलआरमध्ये 0.10 टक्के वाढ केली आहे. हा वाढीव व्याजदर 9 फेब्रुवारी 2024 पासून सर्व मुदतीवरील नवे दर लागू झाले आहेत. ओव्हरनाईट एमसीएलआर 8 टक्क्यांवरून 8.10 टक्के करण्यात आला आहे. एक महिन्याचा एमसीएलआर 8.20 टक्क्यांवरून 8.30 टक्के करण्यात आला आहे…तीन महिन्यांचा एमसीएलआर 8.30 टक्क्यांवरून 8.40 टक्के, 6 महिन्यांचा एमसीएलआर 8.50 टक्क्यांवरून 8.60 टक्के आणि 1 वर्षाचा एमसीएलआर 8.70 टक्क्यांवरून 8.80 टक्के झाला आहे. Bank of Maharashtra new rules updates
कालावधीनुसार सुधारित व्याजदर * 1 ओव्हरनाईट 8.00% 8.10% * 2 एक महिना 8.20% 8.30% * 3 तीन महिने 8.30% 8.40%
* 4 सहा महिने 8.50% 8.60% वर्ष 8.70% 8.80%
*
5 एक
एमसीएलआर ही कोणत्याही कर्जाच्या व्याजदराची मर्यादा आहे. या दरांपेक्षा जास्त दराने ग्राहकांना कर्ज दिले जाते.
बुधवारी एचडीएफसी बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडबेस्ड लेंडिंग रेटमध्ये बदल केला. हे नवे दर 8 फेब्रुवारी 2024 पासून लागू झाले आहेत. एचडीएफसी बँकेचा एमसीएलआर 8.90 ते 9.35 टक्क्यांदरम्यान आहे.
रात्रीच्या एमसीएलआरमध्ये 8.80 टक्क्यांवरून 8.90 टक्क्यांपर्यंत 10 बीपीएसने वाढ करण्यात आली आहे. एचडीएफसी बँकेचा एक महिन्याचा एमसीएलआर 8.85 टक्क्यांवरून 10 बीपीएसने वाढून 8.90 टक्के झाला आहे. तीन महिन्यांचा एमसीएलआर 9 टक्क्यांवरून 9.10 टक्के करण्यात येणार आहे. सहा महिन्यांचा एमसीएलआर 9.30 टक्के करण्यात आला आहे. अनेक ग्राहक कर्जांशी निगडित असलेल्या एक वर्षाच्या एमसीएलआरमध्ये 5.25 टक्क्यांवरून 9.30 टक्के वाढ करण्यात आली आहे. तीन वर्षांचा एमसीएलआर 9.35 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे.