PM Kusum Solar Yojana: नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आमच्या न्यूज पोर्टलवर शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. आणि ही बातमी आहे की आता शेतकऱ्यांना साडेतीन लाख रुपयांचे सौर कृषी पंप अवघ्या 13 हजार रुपयांमध्ये मिळणार आहे. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा लागणार आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील हा अर्ज करू शकता. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकता…
मित्रांनो, गेल्या काही वर्षांत शेती व्यवसाय हे एक मोठे आव्हान बनले आहे. आता विविध नैसर्गिक आपत्तींमुळे शेती पिकांचेही नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी मित्र कर्जबाजारी झाले असून भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास आठ दशके उलटली आहेत. आजही देशाच्या अनेक भागांमध्ये शेतीसाठी वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याचे आपण पाहतो.PM Kusum Solar Yojana
त्याचबरोबर पुरेशा विजेअभावी फुललेली सोनेरी पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उद्ध्वस्त होत आहेत. अगदी स्वतःच्या लहान मुलाप्रमाणे जोपासलेली शेती देखील पाण्याअभावी जळून जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर होत आहेच. शिवाय शेतकऱ्यांवर मानसिक दडपणही येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कितीतरी पटीने वाढले आहे, हेही रोजच्या बातम्यांवरून समजू शकते.
मित्रांनो, हेच मुख्य कारण आहे की राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना पुरेशी वीज मिळावी यासाठी त्यांना सौर कृषी पंप वापरण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. यासाठी केंद्र सरकारने एक चांगली योजना सुरू केली आहे. जी आपल्या सर्वांना माहीत आहे. पीएम कुसुम योजना अर्थातच केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांना सौर कृषी पंप वितरीत करण्यासाठी पंतप्रधान कुसुम योजना सुरू केली आहे.
मित्रांनो, या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात महाकृषी ऊर्जा अभियान राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत सध्या राज्य सरकारकडून पंतप्रधान कृषी योजनेचा दुसरा टप्पा राबविण्यात येत असून त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सुमारे 90 ते 95 टक्के अनुदान मिळत असून उर्वरित 5 ते 10 टक्के रक्कम शेतकऱ्यांना स्वत: भरावी लागणार आहे.PM Kusum Solar Yojana