Maharashtra Ring Road : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये शेकडो प्रकल्प पूर्ण झाली आहेत. अनेक महामार्गाची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच काही महामार्गांची कामे अजूनही सुरू आहेत.
त्यामुळे महाराष्ट्राची दळणवळण व्यवस्था मजबूत झाली असून राज्यातील कृषी, उद्योग, शिक्षण, पर्यटन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांना उभारी मिळाली आहे. महाराष्ट्राचा या निमित्ताने एकात्मिक विकास सुनिश्चित होत आहे.
सध्या राज्यात राज्यात आणि मुंबई ते उपराजधानी नागपूर यादरम्यान विकसित होत असलेल्या समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या महामार्गाचे आत्तापर्यंत नागपूर ते भरवीर असे सहाशे किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून यावर वाहतूक सुरू झाली आहे.
तसेच उर्वरित शंभर किलोमीटरचे काम देखील जलद गतीने सुरू आहे. अर्थातच लवकरात लवकर महाराष्ट्राला 700 किलोमीटर लांबीच्या संपूर्ण समृद्धी महामार्गाची भेट मिळणार आहे. या महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास जलद होणार आहे.
याशिवाय राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ महामार्ग देखील तयार केला जाणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने कल्याण ते लातूर यादरम्यानही महामार्ग तयार करण्याची योजना आखली आहे.
या दोन शहरादरम्यान सध्या प्रवासासाठी दहा तासाचा वेळ खर्च करावा लागत आहे मात्र जेव्हा नवीन महामार्ग तयार होईल तेव्हा हा प्रवास फक्त आणि फक्त चार तासात पूर्ण होऊ शकणार आहे.
याशिवाय पुणे ते नाशिक दरम्यान इकॉनोमिक कॉरिडॉर तयार करणे प्रस्तावित आहे. नागपूर ते विजयवाडा दरम्यान महामार्ग विकसित होणार आहे.
याशिवाय राज्यातील अनेक शहरांलगत रिंग रोड देखील तयार केले जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार देशातील 51 शहरात रिंग रोड तयार होणार असून आपल्या महाराष्ट्रात देखील अनेक शहराभोवती रिंग रोड विकसित होणार आहेत.
सध्या संपूर्ण देशभरात 28 रिंग रोडचे काम केले जात आहे. आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्यात पुणे, धुळे, अमरावती, सोलापूर, नागपूर, नाशिक या शहरा लगत रिंग रोड तयार करणे प्रस्तावित करण्यात आले आहे.
तसेच बेळगाव, इंदूर या राज्यालगत असलेल्या शहरात देखील रिंग रोड तयार केला जाणार आहे. येथे रिंगरोड आणि बायपास झाल्यानंतर शहरातील मध्यवस्तीत होणारी वाहनांची गर्दी कमी होणार आहे.