Land Record News | 1880 सालापासूनचे खाते, उतारे, सातबारा आणि जुने फेरफार डाऊनलोड करा फक्त दोन मिनिटात

Land Record News


Land Record News: नमस्कार शेतकरी मित्रांनो, जमिनीशी संबंधित कोणताही व्यवहार करायचा असल्यास आपल्याकडे खाते, उतारे, सातबारा आणि जुने फेरफार हे कागदपत्रे असणे आवश्यक असते. म्हणजेच थोडक्यात आपल्याला आपल्या जमिनीचा व्यवसाय माहीत असणे आवश्यक असते. आणि आता हा इतिहास आपल्याला केवळ आपल्या मोबाईलवर दोन मिनिटात पाहता येणार आहे. यासाठी तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करा.


शेतकरी मित्रांनो भुमी अभीलेख या कार्यालयात 880 सालापासूनचे कागदपत्रे उपलब्ध झाले आहेत. त्याचबरोबर आता भूमी अभिलेख ऑनलाईन पद्धतीने देखील शेतकऱ्यांसमोर आणले आहे. त्याचबरोबर सरकारने ही माहिती 19 जिल्ह्यांपूर्ती मर्यादित ठेवली आहे. येत्या काही दिवसात ही माहिती सर्व जिल्ह्यांना ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने जुने कागदपत्रे कशा पद्धतीने काढायची याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात.

शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून भूमी अभिलेख या सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या

 
  • https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/
  • त्या ठिकाणी गेल्यानंतर E-Records ( Archived Document) हा पर्याय तुम्हाला शोधावा लागेल. आणि या पर्यायावर क्लिक करा
  • या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल त्यानंतर तुम्ही उजवीकडील बाजूला भाषा या पर्यायावर क्लिक करा. आणि तुम्हाला जी भाषा पाहिजे ती भाषा निवडा.
  • परंतु मित्रांनो तुम्ही जर या वेबसाईटला पहिल्यांदाच भेट देत असाल तर तुम्हाला येथे नवीन वापर करता नोंदणी करावी लागणार आहे.
  • यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरावी लागेल..
  • तुमची वैयक्तिक संपूर्ण माहिती भरल्यानंतर लॉगिन या पर्यायावर क्लिक करा
  • त्यानंतर तुम्हाला चार ते पाच प्रश्न विचारले जातील त्यामधील केवळ एका प्रश्नाचे उत्तर देऊन कॅप्चा कोड टाकावा लागेल. आणि वरील सर्व प्रोसेस झाल्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करा…
  • त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुमच्या मोबाईलवर वापर करता नोंदणी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे आणि लॉगिन करण्यासाठी येथे क्लिक करा असे दिले जाईल
  • त्यानंतर इथे क्लिक करा या पर्यायावर क्लिक करा
  • त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जो युजरनेम आणि पासवर्ड टाकलेला आहे तो त्या ठिकाणी टाका आणि परत लॉगिन करा
  • त्यानंतर तुम्ही तुमच्या जमिनीचे कोणतेही कागदपत्र केवळ दोन मिनिटात डाऊनलोड करू शकता.Land Record News



Post a Comment

Previous Post Next Post