Helmet on Bike Rule : हेल्मेट घालणे हे अनिवार्य आहे, तसा कायदा आहे आणि कायद्याचं पालन झाले पाहिजे, असे सांगत पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एक प्रकारे हेल्मेट सक्तीचे सुतोवाच दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात पुणेकरांना हेल्मेट सक्तीला सामोरे जावे लागते की काय असा प्रश्न आता उपस्थित झालाय. खरे पाहता मागील काही दिवसात रस्त्या अपघाताची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे रस्ते अपघातातील मृत्यूची संख्या रोखण्यासाठी प्रशासनाने हेल्मेटसक्ती केलेली आहे.
मात्र या हेल्मेट सक्तीला अनेक शहरात विरोध करण्यात आला होता. यामध्ये पुणे शहर आघाडीवर होते. हेल्मेट सक्ती विरोधात अनेकदा पुणेकर रस्त्यावर उतरले होते. एकूणच काय तर पुणेकर हे नेहमी हेल्मेट सक्तीच्या विरोधात असतात. आणि अशातच नवनियुक्त आयुक्त अमितेश कुमार यांनी हेल्मेट घालणे अनिवार्य असल्याचे सांगत एक प्रकारे हेल्मेट सक्तीचे सुतवाच केले आहेत. त्यामुळे पुणेकर आयुक्त अमितेश कुमार यांच्या या भूमिकेकडे कसे पाहतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहेत. दरम्यान पुणे शहराचे आयुक्त राहिलेले रितेश कुमार यांची पदोन्नती झाली आहे. त्यांच्या जागी आता अमितेश कुमार यांची नियुक्ती झाली आहे. अमितेश कुमार यांनी आज आपला पदभार स्वीकारला.
👉👉 २५००० रू. बसणार दंड
👈👈
त्यानंतर त्यांनी लगेच माध्यमांची संवाद साधला. यावेळी बोलत असताना त्यांनी क्राईम कंट्रोल टॉपमोस्ट प्रायोरिटी असेल सांगतानाच गुन्हेगारांना इशारा देखील दिला आहे. याशिवाय त्यांनी कोयत्याचा वापर करणाऱ्यावर परिणामकारक कारवाई करणार असल्याचेही सांगितले. बेसिक पोलिसिंग, व्हिजीबल पोलिसिंग, लॅा ॲंड ॲार्डर यावर विशेष भर राहणारा असून पुणे शहरातील वाहतुकीची समस्या, महिला बाल सुरक्षा , व्हीआयपी सिक्युरिटी, सायबर गुन्हे हे देखील आपल्या कामकाजातील महत्वाचे मुद्दे असतील असे सांगितले.