Gharkul Yojana List 2024: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपणास या बातमीत प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत कोणत्या नागरिकांना घरकुल मिळणार आहे. त्याचबरोबर या योजनेसाठी किती घरकुल मंजूर झाली आहेत. अशी संपूर्ण माहिती आपण या बातमीत पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.
अमृत महाआवास अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल बांधकामासाठी अनुदान दिले जाते. यामागील कारण म्हणजेच, ग्रामीण भागातील अनेक नागरिक बेघर आहेत. त्याचबरोबर त्यांची परिस्थिती कमकुवत असल्यामुळे त्यांना घरे बांधणे शक्य नसते. त्यामुळे शासनाकडून घरकुल योजना अंतर्गत अशा लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम साठी अर्थसहाय्य दिले जात आहे.Gharkul Yojana List 2024
सध्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य शासनाच्या योजनेतून 13.14 लाख घरकुले पूर्ण करण्यात आले आहेत. त्याचबरोबर माहितीनुसार, 5.61 लाख घरे प्रगतीपथावर आहेत. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत जवळपास 14.26 लक्ष घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर त्यापैकी 95 टक्के घरकुलांना मंजुरी मिळाली आहे.
त्याचबरोबर उर्वरित राहिलेल्या लाभार्थ्यांना लवकरच घरकुल योजने अंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. मंजूर घरकुलांचे पैकी 9.48 लाख घरकुले विविध योजनांच्या कृतीसंगमातून पूर्ण झाले आहेत. त्याचबरोबर आता घरकुल योजनेअंतर्गत भूमीहीन लाभार्थ्यांना जागा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 66 हजार पेक्षा जास्त नागरिकांना या योजनांतर्गत जागा उपलब्ध करून दिली आहे.Gharkul Yojana List 2024
घरकुल योजनेच्या यादीत नाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या पद्धतीचा अवलंब करा.
सर्वप्रथम पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा
- https://pmayg.nic.in/netiayHome/home.aspx
- त्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये सरकारची अधिकृत वेबसाईट ओपन होईल.
- त्यानंतर तुम्ही सर्वात वरील मध्ये तिसऱ्या क्रमांकावर Awaassoft या पर्यायावर क्लिक करा
- त्यानंतर ड्रॉप-डाऊन मेन्यू मधून Report या पर्यायावर क्लिक करा
- त्यानंतर तुमच्या मोबाईलवर नवीन पेज ओपन होईल
- त्यानंतर तुम्ही H.Social Audit Report , त्याखाली असलेल्या Beneficiary details for verification या पर्यायावर क्लिक करावे
- Beneficiary details for verification या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला तुमची वैयक्तिक माहिती विचारली जाईल
- त्यानंतर तुम्ही राज्य, जिल्हा, तालुका, तुमच्या गावाचे नाव इत्यादी माहिती भरा
- त्यानंतर वर्ष, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हा पर्याय निवडून घ् या
- त्यानंतर कॅपच्या कोड गणितीय प्रक्रिया मध्ये दिलेला असेल, तो सोडवून सबमिट या पर्यायावर क्लिक करा
- तुम्ही सबमीट पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही निवडलेल्या गावाची म्हणजे तुमच्या गावाची यादी दिसेल.
- त्यानंतर ती यादी तुम्ही पीडीएफ मध्ये आणि EXCEL स्वरूपात तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता.
- तर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या मोबाईलवर एकदम सोप्या पद्धतीने घरकुल यादी पाहायला मिळेल.Gharkul Yojana List 2024