Free Sarees in Ration Shops | या महिलांना मिळणार रेशन दुकानात मोफत साडी

Free Sarees in Ration Shops

Free Sarees in Ration Shops : रेशनकार्ड असणाऱ्यांना अन्नधान्या बरोबरच साडीही सरकार आता देणार आहे. अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या कुटूंबानाच मात्र याचा लाभ मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान या शासन निर्णयाचा शिर्डी तालुक्यातील ५ हजार ५९७ कुटूंबियांना लाभ Free Sarees in Ration Shops होणार आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार या साड्या वाटप करणार असून शिर्डी तालुक्यातील साडी वाटपाचा प्रारंभ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. महायुती सरकारने कॅप्टीव्ह योजनेंतर्गत साड़ी वाटप करण्याची योजना सुरु केलीये.



लोणी बुद्रुक या ठिकाणी याचा प्रारंभ शालिनी विखे यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे. याप्रसंगी प्रातिनिधीक स्वरुपात महिलांना साडीचे वितरण करण्यात आले असून आता राज्य शासनाच्या वतीने तालुक्यातील महिलांना आता रेशन दुकानामधून साडी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. याप्रसंगी सरपंच कल्पना मैड, सुचित्रा विखे, आशा कडलग, गणेश विखे, माजी सिनेट सदस्य अनिल विखे, माजी सरपंच लक्ष्मण यासह बनसोडे, नानासाहेब म्हस्के यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित स्थित होते .



शालिनी विखे म्हणाल्या, राज्य शासनाच्या माध्यमातुन सामान्य नागरिकांसाठी सुरु असलेल्या योजनांचा लाभ होत आहे. शासनाने याआधी अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटूंबांना आनंदाचा शिधा देखील दिलाय. वर्षभरातील चैत्रपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी गणपती व दिवाळी सणानिमित्त तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी १०० रुपयात आनंदाचा शिधा उपलब्ध करुन दिला आहे. या शिधापत्रिका धारकांना आता सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने एक साडी दरवर्षी भेट देण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे.




Post a Comment

Previous Post Next Post