आता लाईट बिल भरायची गरज नाही.! सरकारने सुरू केली नवीन योजना मिळणार 78 हजार रुपये अनुदान

आता लाईट बिल भरायची गरज नाही.! सरकारने सुरू केली नवीन योजना मिळणार 78 हजार रुपये अनुदान

नमस्कार मित्रांनो ‘प्रधानमंत्री सूर्यघर’ मोफत वीज योजनेंतर्गत, प्रत्येक कुटुंबाला 78 हजार पर्यंतचे अनुदान (सवलत) मिळेल. ही योजना महाराष्ट्रातही राबविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महावितरण’ला दिल्या आहेत.

सौरऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करण्यासाठी घराच्या छतावर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवण्याची आणि त्या विजेचा वापर घराच्या विद्युत गरजा भागवण्यासाठी करण्याची योजना आहे. या दृष्टीने आवश्यकतेपेक्षा जास्त वीजनिर्मिती केल्यास वीज बिल शून्य होते आणि अतिरिक्त वीज ‘महावितरण’ला विकून उत्पन्न मिळवता येते. रूफटॉप सोलर सिस्टीम बसविणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक किलोवॅट क्षमतेच्या दोन किलोवॅटपर्यंत 30,000 रुपये अनुदान मिळेल. कोणीही एक किलोवॅट (तीन किलोवॅट) क्षमतेची यंत्रणा बसविणाऱ्याला एक किलोवॅटसाठी रु. 18,000 अतिरिक्त अनुदान मिळेल, म्हणजे एक किलोवॅटसाठी रु. 30,000, दोन किलोवॅटसाठी रु. 60,000 आणि तीन किलोवॅटसाठी रु. 78,000. अनुदान थेट केंद्र सरकारकडून मिळणार आहे.

योजनेनुसार, वीजग्राहकांनी बसवलेल्या सौर यंत्रणेची क्षमता कितीही असली तरी प्रति ग्राहक कमाल अनुदान 78,000 रुपये असेल. 13 फेब्रुवारीनंतर, राष्ट्रीय पोर्टलवर रूफटॉप सोलरसाठी अर्ज करणाऱ्या सर्व ग्राहकांना केंद्र सरकारकडून नवीन दरानुसार सबसिडी मिळेल.

एक किलोवॅट क्षमतेच्या रूफ टॉप सोलर सिस्टिममधून दररोज सुमारे चार युनिट (दरमहा १२० युनिट) वीज तयार होते. महिना दीडशे युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या कुटुंबाला दोन किलोवॅट क्षमतेची रूफ टॉप सोलर सिस्टिम पुरेशी आहे. दरमहा १५० ते ३०० युनिट वीज वापर असणाऱ्यांसाठी दोन ते तीन किलोवॅट क्षमतेची सिस्टिम पुरेशी ठरते.



Post a Comment

Previous Post Next Post