Government Yojana : नमस्कार मित्रांनो आज आपण या बातमीमध्ये नवीन लग्न झालेला मुलामुलींसाठी केंद्र सरकार कोणती नवीन योजना राबवणार संपूर्ण माहिती घेणार आहोत. सरकारने नवविवाहित जोडप्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनेमध्ये दोन लाख 50 हजार रुपये सरकार वितरित करणार आहे.योजनेचा अर्ज कसा करायचा, योजनेचा लाभ घेण्यासाठी नवविवाहित जोडप्यांची योग्य पात्रता काय असेल, योजनेसाठी कोणत्या अटी लागू होतील हे आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत.
मित्रांनो नवविवाहित जोडप्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या गावातील आमदार किंवा खासदार यांच्याकडे जाऊन तुम्ही अर्ज करू शकतात किंवा तुम्ही राज्य सरकार किंवा जिल्हा प्रशासन कार्यालयामध्ये जाऊन सुद्धा योजनेचा अर्ज तुम्हाला करता येईल. अर्ज केल्यानंतर तो अर्ज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन कार्यालयामध्ये पाठवला जातो.कार्यालयामध्ये अर्जाची पडताळणी होऊन अर्ज स्वीकारला जाईल तेथून पुढे योजनेचा फायदा तुम्हाला होईल.
या योजनेअंतर्गत कोणत्या प्रवर्गातील नवविवाहित जोडप्यांना योजनेचा लाभ घेता येईल. त्याचबरोबर या योजनेसाठी कोणती अट असेल ती आपण पाहूया. या योजनेअंतर्गत सर्वसामान्य प्रवर्गातील जोडप्यांना योजनेचा लाभ घेता येईल. आणि लग्न झालेल्या मुला मुलींचा विवाह एकाच जातीमध्ये नसावा तरच या योजनेचा लाभ विवाहित जोडपे घेऊ शकेल. परंतु 1955 अंतर्गत नोंदणीकृत तुमचा विवाह हिंदू विवाह कायदा असल्यास योजनेचा लाभ घेता येईल.Government Yojana
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे
नवीन विवाह केलेल्या पती आणि पत्नीचे जातीचे प्रमाणपत्
र
- पती आणि पत्नी चे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- हे लग्न तुमचे पहिले असल्याचे काही पुरावा
- संयुक्त बँक खाते
- तुम्ही विवाहित असल्याचे प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- वरील दिलेले सर्व कागदपत्रे तुमच्याकडे फॉर्म जमा करताना असले पाहिजे
आंतरजातीय विवाह योजनेमार्फत सामान्य प्रवर्गातील महाराष्ट्रातील मुलगा किंवा मुलगी अनुसूचित जातीच्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न केल्यास त्यांना या योजनेमार्फत राज्य सरकारकडून काही आर्थिक मदत दिली जाईल. या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील रहिवाशांना मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, ज्या जोडप्यांनी विवाह केला आहे त्यांचा विवाह हिंदू विवाह कायदा 1955 किंवा विशेष विवाह कायदा 1954 अंतर्गत नोंदणीकृत असला पाहिजे.
आंतरजातीय विवाह योजना अंतर्गत लाभार्थ्याला किती रुपये मिळणार?
आंतरजातीय विवाह केल्यास त्याचबरोबर फॉर्म भरून समाजकल्याण विभागात जमा केल्यास. आणि लाभार्थी निवडून आल्यास त्या लाभार्थ्याला राज्य सरकारकडून तब्बल 50 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाईल. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब फाउंडेशन अंतर्गत 2.5 लाख रुपये दिले जाणार आहेत. म्हणजेच या योजनेमार्फत एकूण तीन लाख रुपये लाभार्थ्याला दिले जाणार आहेत.
त्याचबरोबर लाभार्थ्यांना दिली जाणारी रक्कम ही त्याच्या थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे. नवीन माहितीनुसार, या योजनेची एक अट रद्द करण्यात आले आहे. ती म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता लाभार्थ्याची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा रद्द करण्यात आले आहे. यामुळे आता महाराष्ट्रातील लाखो नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.Government Yojana