Spam Call Blocked | तुम्ही स्पॅम कॉल्समुळे त्रस्त आहात का? मग लगेच 2 मिनिटात ही सेटिंग चालू करून स्पॅम कॉल कायमचे बंद करा

Spam Call Blocked

Spam Call Blocked: आजच्या स्मार्ट जगात स्मार्टफोन जवळपास प्रत्येकाच्या खिशात पोहोचला आहे. स्मार्टफोन हा इतरांना कॉल करण्यासाठी त्याचबरोबर टेक्स्ट मेसेज आणि सोशल मीडिया यासारख्या विविध टेक्नॉलॉजी चा वापर करण्यासाठी वापरला जाणारा सर्वात मोठे साधन झाले आहे. या स्मार्टफोनमुळे जगातील कोणतेही घटना आपल्याला लगेच कळते. त्याचबरोबर आपल्याला पडलेला कोणताही प्रश्न या मोबाईलवरून सुटतो.

स्मार्टफोनमुळे आयुष्य सोपे झाले आहे, परंतु डोकेदुखी देखील वाढलेली आहे. जेव्हा तुम्ही फोनवर एखाद्या बिन ओळखी व्यक्तीला बोलता तेव्हा ते क्रेडिट कार्ड, स्मार्ट कार्ड, वैयक्तिक कर्ज आणि काहीवेळा काहीतरी विकत घ्या यासाठी तुम्हाला कॉल करताना दिसतात.Spam Call Blocked


तुम्ही काही महत्त्वाच्या कामाच्या ठिकाणी असाल जेव्हा फोन वाजतो आणि तुम्ही तो फोन उचलता, तेव्हा दुसऱ्या टोकावरील व्यक्ती विजेच्या वेगाने म्हणते, “आमची कंपनी तुम्हाला आयुष्यभर मोफत क्रेडिट कार्ड देत आहे.”

कधी लॉटरी जिंकल्याची बातमी सांगतात तर कधी साध्या प्रश्नाचे उत्तर देऊन विशेष बक्षीस जिंकण्याचे वचन देतात. हे कॉल सहसा टेलीमार्केटिंग कॉल असतात. टेलिकम्युनिकेशनच्या भाषेत याला ‘स्पॅम कॉल अलर्ट’ म्हणतात.

नुकतेच ‘लोकल सर्कल’ या कम्युनिटी सोशल प्लॅटफॉर्मने यासंदर्भात सर्वेक्षण केले. सर्वेक्षणात देशभरातील 60 हजार मोबाईल वापरकर्त्यांचा समावेश करण्यात आला होता.

या सर्वेक्षणात सामील असलेल्या 60% लोकांनी सांगितले की त्यांना दररोज त्यांच्या फोनवर तीन किंवा अधिक स्पॅम कॉल येतात. तर केवळ 6 टक्के लोक होते ज्यांना असा कोणताही कॉल आला नव्हता.Spam Call Blocked



Post a Comment

Previous Post Next Post