Land Record News: नमस्कार मित्रांनो, आज आपण एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तो म्हणजे शेतकरी आता एक गुंठा जमीन देखील विकू शकतात. त्यामुळे यासाठी सरकारने काही अटी आणि शर्ती ठेवल्या आहेत, त्या अटींनुसार तुम्ही कोणत्याही जमिनीची प्रक्रिया करून खरेदी किंवा विक्री करू शकता. यासाठी शासनाने राजपत्रही जारी केले असून या राजपत्रांमध्ये नेमके काय म्हटले आहे हे पाहायचे असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून राजपत्राद्वारे माहिती मिळवू शकता.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी आणि उपयुक्त बातमी असणार आहे. कारण सध्या राज्यात तुकडाबंदी कायदा लागू झाला आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. तुकडा बंदी कायदा म्हणजे सरकारने असा कायदा केला आहे की तुम्ही जमीन तुकड्यांमध्ये विकू शकत नाही. तसेच सरकारने तुकडा बंदी कायद्यात काही सुधारणा केल्या असून आता गुंठासारखी जमीनही विकता येणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला या प्रकारच्या गुंठ्यांची नोंदणी करायची असेल तर त्यासाठी काही नियम आहेत, ज्याबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत.
परंतु काही कायद्यांमुळे शेतकऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता आणि सध्याच्या तुकडाबंदी कायद्यानुसार दहा गुंठ्यापेक्षा कमी बागायती जमीन आणि वीस गुंठ्यापेक्षा कमी शेतजमीन विकता येत नाही. तसेच यापेक्षा कमी क्षेत्रफळाची जमीन खरेदी-विक्री करायची असेल, तर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल, असा नियमही आणण्यात आला आहे.Land Record News