Star Kisan Ghar Yojana | शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी ही बँकेचे बिनव्याजी ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज

Star Kisan Ghar Yojana

Star Kisan Ghar Yojana : नवीन वर्षात शेतकऱ्यांसाठी (Good news for farmers) आनंदाची बातमी समोर आली आहे. देशातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी (Public Sector Banks) एक असलेल्या बँक ऑफ इंडियाने (Bank Of India) शेतकऱ्यांसाठी जबरदस्त सुविधा सुरू केली आहेत. बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांसाठी ‘स्टार किसान घर योजना’ (Star Kisan Ghar Yojana) नावाची विशेष कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना घरबांधणीपासून ते घर दुरुस्तीच्या कामापर्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे कर्ज फेडण्यासाठी बँकेकडून शेतकऱ्यांना पुरेसा वेळही दिला जात आहे.



बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना मिळणार लाभ

बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना या विशेष योजनेचा लाभ मिळणार आहे. वास्तविक ही योजना BOI ने फक्त आपल्या ग्राहकांसाठी सुरू केली आहे .



बँक देते 50 लाखांपर्यंतचे गृहकर्ज

या विशेष योजनेअंतर्गत बँक ऑफ इंडिया जबरदस्त सुविधा देत आहे. परंतु या योजनेचा लाभ काहीच शेतकरीच घेऊ शकतात. ज्या शेतकर्‍यांना त्यांच्या शेतजमिनीवर फार्म हाऊस बांधायचे आहे किंवा सध्याच्या घराची दुरुस्ती किंवा नूतनीकरण करायचे आहे त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे.



शेतकऱ्यांसाठी स्वप्नातील घर बांधणे खूप सोपे

आता शेतकर्‍यांना त्यांच्या स्वप्नातील घर बांधणे खूप सोपे झाले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना 1 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज 8.05 टक्के व्याजदराने मिळणार आहे. त्याची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांना 15 वर्षांचा कालावधी दिला जाईल.



घर दुरुस्तीसाठी 10 लाख रुपये

बँक ऑफ इंडियाच्या या योजनेचा लाभ फक्त KCC खाते असलेले शेतकरी घेऊ शकतात. या विशेष योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नवीन फार्म हाऊस किंवा घर बांधण्यासाठी 1 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा दिली जाईल. याशिवाय सध्याच्या घराची दुरुस्ती किंवा नूतनीकरणाचे काम करणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल.


ITR देण्याची गरज नाही

या योजनेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना आयटी रिटर्न देण्याची गरज भासणार नाही. बँक ऑफ इंडियाच्या ‘स्टार किसान घर’ कर्ज योजनेशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही जवळच्या BOI शाखेला देखील भेट देऊ शकता किंवा बँकेच्या टोल फ्री क्रमांक 1800 103 1906 वर संपर्क साधू शकता.



Post a Comment

Previous Post Next Post