Pik Vima : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये माहिती पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार नाही याची संपूर्ण माहिती आपल्याला या लेखात मिळणार आहे यामुळे आपण हा लेख संपूर्ण वाचावा.
यामध्ये पाहिले तर खरीप हंगामामध्ये पावसाचा मोठा खंड पडला होता यामुळे बरेच पिके वायला गेली होती यामुळे जिल्हा अधिकाऱ्यातर्फे पिक विमा कंपन्यांना आदेश देण्यात आले होते की शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विमा वाटप करण्यात यावा मात्र याविषयी काही विमा कंपन्याकडून केंद्रीय समितीकडे दाद मागविण्यात आली होती तरी तो निकाल पिक विमा कंपन्याकडून आला आहे त्यामध्ये सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम पीक विमा फेटाळण्यात आला आहे.
राज्य सरकारने 21 दिवसापेक्षा कमी पाऊस झाला असे दाखवले आणि त्यानंतर 25% अग्रीम पीक विमा वाटप करण्याचे आदेश देण्यात आले पण शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट न दिसून आल्याचे पिक विमा कंपनीला वाटते त्यामध्ये दुष्काळी नियमाचे व इतर कोणत्याही नियमाचे पालन केले नाही असे सांगत केंद्रीय समितीकडून पिक विमा कंपनीच्या बाजूने हा निकाल लावण्यात आला आहे.
या सात जिल्ह्यांना अग्रीम पीक विमा मिळणार नाही
मित्रांनो आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही त्या सात जिल्ह्यांची माहिती देत आहोत की ज्यांना अग्रीम पिक विमा मिळणार नाही त्यामध्ये सर्वात आधी अहमदनगर यानंतर नाशिक तसेच सोलापूर, सातारा ,अमरावती, लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यांना अग्रीम पिक विमा मिळणार नाही.