Gas Cylinder Price | गॅस सिलेंडरच्या दरात मोठी घसरण

Gas Cylinder Price

Gas Cylinder Price : नवीन वर्षात (Happy New Year 2024) सर्वसामान्यांना मोठी भेट मिळाली आहे. आज एलपीजी गॅस सिलेंडर (LPG Cylinder) स्वस्त झाला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरचे नवे दर जारी केले आहेत.

आज 1 जानेवारी 2024 रोजी गॅस सिलेंडरच्या दरात घट करण्यात आली आहे. महिन्याभरात गॅस सिलेंडरचे दर दुसऱ्यांदा कमी झाले आहेत.

व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्त

आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सरकारीन तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात करत मोठी भेट दिली आहे. सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑइल (IOC), भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात केली आहे.



महिन्याभरात दुसऱ्यांदा सिलेंडरच्या दरात घट करण्यात आली आहे. दरम्यान, आज गॅस सिलेंडरच्या दरात केलेली कपात सामान्य आहे Gas Cylinder Price.


आज 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात एक ते दीड रुपयांनी कमी झाले आहे. दरम्यान, 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरचा दर कायम आहेत. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

प्रमुख शहरांमध्ये LPG च्या नवीन किंमती

आज व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या दरात कपात केल्यानंतर आज दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1,755.50 रुपये झाली आहे. याआधी हा दर 1,757 रुपये होता, त्यामुळे दिल्लीत दर दीड रुपयांनी कमी झाले आहेत Gas Cylinder Price.



चेन्नईमध्ये एलपीजीच्या किंमतीत सर्वाधिक 4.50 रुपयांची कपात करण्यात आली असून 19 किलोचा सिलेंडर आता 1,924.50 रुपयांना मिळेल. मुंबईतील व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा दर 1.50 रुपयांनी घसरून 1,708.50 रुपये झाला आहे.



कोलकातामध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 50 पैशांनी वाढली असून आज दर 1,869 रुपये आहे Gas Cylinder Price.

एका महिन्यात दुसऱ्यांदा कपात

भारतीय तेल कंपन्यांनी याआधी 22 डिसेंबरलाही एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली होती. त्यानंतर 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 30.50 रुपयांनी कमी झाली.

त्याआधी 1 डिसेंबरलाही व्यावसायिक एलपीजी सिलिंडर स्वस्त झाले होते. सरकारी तेल कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीचा पंधरवड्याने आढावा घेतात Gas Cylinder Price.


घरगुती एलपीजी सिलेंडरचा भाव काय?

आज 1 जानेवारी रोजी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात बदल झाला असला, तरी 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरचे दर स्थिर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.



गेल्या चार महिन्यांपासून घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याआधी 30 ऑगस्ट रोजी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात बदल करण्यात आला होता, त्यानंतर सिलेंडरचे दर कायम आहेत.

आज मुंबईमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा भाव 902.50 रुपये तर, दिल्लीमध्ये 903 रुपये आहे. त्यासोबतच चेन्नईमध्ये 918.50 आणि कोलकातामध्ये 929 रुपये आहे Gas Cylinder Price.






Post a Comment

Previous Post Next Post