UPI Rules | युपीआय संबंधित हे पाच नवीन नियम तुम्हाला माहिती आहे का नसेल तर जाणुन घ्या अन्यथा होईल मोठे नुकसान

UPI Rules

UPI Rules : आपल्या भारत देशात जवळपास आज चाळीस कोटीच्या आसपास युपीआय वापरकर्ते झाले आहेत. आज हाॅटेल मधील बील देण्यापासून किराणा घेण्यासाठी तसेच बाजारातुन भाजीपाला विकत घेण्यासाठी देखील आपण मोबाईलवरून आॅनलाईन पदधतीने युपीआय दवारे गुगल पे फोन पे च्या माध्यमातून पेमेंट करत असतो.

त्यामुळे खिशात पैसे ठेवण्याची आपल्याला आवश्यकता देखील भासत नाही. मागील वर्षी २०२३ मध्ये युपीआय दवारे सोळा लाख कोटींपेक्षा अधिक व्यवहार झाले.पण जसे आॅनलाईन व्यवहाराचे प्रमाण वाढते आहे तसे आॅनलाईन फ्राॅडचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत आहे.


सायबर क्राईमने दिलेल्या एका आकडेवारीनुसार २०२३ मध्ये झालेल्या सोळा लाख कोटींच्या व्यवहारात ३० हजार रुपये इतकी चोरी करण्यात आली आहे.

UPI Rules

साहजिकच आहे आॅनलाईन व्यवहार वाढणार म्हणजे आॅनलाईन चोरीचे प्रमाण देखील वाढणारच आहे म्हणून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अणि युपीआय व्यवहार सुरक्षेसाठी युपीआय वर २०२४ मध्ये काही नवीन नियम लागु करण्यात येणार आहेत.

हे सर्व नवीन नियम १ जानेवारी २०२४ पासुन लागु देखील करण्यात आले आहे.

पहिला नियम –

२०२३ मध्ये युपीआय वापरकर्ते यांनी न वापरलेले सर्व युपीआय अॅप्स बंद करण्यात येणार आहे.

गुगल पे,फोन पे,पेटीयम, अॅमेझाॅन पे,भीम अॅप यापैकी जे अॅप आपल्या मोबाईल मध्ये असेल अणि त्या अॅप्स दवारे आपण संपूर्ण वर्षभरात एकवेळा देखील ट्रान्झॅक्शन केले नसेल तर सुरक्षिततेच्या कारणास्तव हे अॅप आरबीआयच्या वतीने लाॅक करण्यात येईल.

ज्यांनी १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वर्षभरात फोन पे गुगल पे इत्यादी युपीआय अॅपवरून कुठलाही व्यवहार केला नाही त्यांचे अॅप आरबीआयकडुन रद्द करण्यात येणार आहे.

दुसरा नियम –

युपीआयच्या डेली पेमेंटवर आता लिमिट लादण्यात येणार आहे.युपीआयचे डेली पेमेंट कमी करण्यात येणार आहे हे लिमिट आता एक लाखापर्यंत केले जाणार आहे.

एक लाखाच्या वरचा कुठलाही व्यवहार आता आपल्याला युपीआय दवारे करता येणार नाही.

तिसरा नियम –

स्पेशल पेमेंट लिमिट हे पाच लाखांपर्यंत करण्यात येईल.शाळा,काॅलेज हाॅस्पिटल मधील बील तिथले सर्व व्यवहार आपणास एक दिवसात पाच लाखांपर्यंत करता येईल.

चौथा नियम –

आरबीआयने वाढत्या सायबर क्राईमला लक्षात घेऊन याला आळा घालण्यासाठी एक नवीन बदल केला आहे.

जानेवारी २०२४ पासुन दोन हजार पेक्षा जास्त रकमेचे व्यवहार पुर्ण होण्यासाठी चार तास इतका कालावधी लागेल.

आतापर्यंत युपीआय दवारे केलेले पेमेंट लगेच समोरच्या व्यक्तीच्या खात्यात जमा होत होते.पण आता २०२४ पासुन कुठल्याही नवीन व्यक्ती सोबत केलेला व्यवहार पुर्ण व्हायला चार तास लागतील.

हा नियम नवीन लोकांसोबत दोन हजार रूपये पेक्षा अधिक व्यवहारांवर लागु केला जाईल.

पाचवा नियम –

युपीआय ट्रान्झॅक्शन कॅन्सल हा सुद्धा एक नवीन बदल आहे.नवीन व्यक्तीसोबत केलेला युपीआय व्यवहार आपल्याला चार तासांच्या आत रद्द करता येईल.यानंतर पैसे पुन्हा आपल्या खात्यात जमा होतील.





Post a Comment

Previous Post Next Post