Msrtc News : नमस्कार मित्रांनो, एसटी महामंडळाची लाल बस म्हणजेच आपली लाल परी होय. गेल्या काही वर्षांत एसटी महामंडळाच्या सर्व प्रक्रिया ऑनलाइन होताना आपण पाहत आहोत. म्हणजे आपली एसटी बस आता आधुनिकीकरणाकडे वाटचाल करत आहे. एसटीचे तिकीट काढल्यानंतरही एसटी आता कुठे आहे? म्हणजेच ती कोणत्या गावात आहे? हे आपल्याला आपल्या स्मार्टफोनवरून कळणार आहे.
त्याचबरोबर मित्रांनो, तुमच्या गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी एसटी बसला किती वेळ लागेल? आता हे सर्व आपण मोबाईलवर ऑनलाइन पाहू शकतो. याबद्दल आपण या बातमीचे संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
आपण सर्वजण नक्कीच एसटीने प्रवास करतो. मात्र अनेक वेळा एसटी वेळेवर येत नाही. यामुळे आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा अनेक कारणामुळे एसटीचा प्रवास सुखदायी होत नाही. यामुळे आता शासन एसटीचा प्रवास सर्व नागरिकांना आरामदायी मिळावा यासाठी विविध योजना राबवत आहे. यामध्ये आता ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास तसेच महिलांसाठी 50 टक्के आरक्षणाचा समावेश आहे. त्याचबरोबर सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे एसटीमध्ये प्रवासाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
Msrtc News
आता एसटी महामंडळाने सर्वसामान्य नागरिकांना घरबसल्या एसटी महामंडळाच्या बसचे सध्याचे लाईव्ह लोकेशन मिळावे यासाठी नवीन मोबाईल अॅप्लिकेशनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हे मोबाईल अॅप्लिकेशन लवकरच सर्व नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. सध्या छत्रपती संभाजी नगर विभागातून विविध मार्गांवर 550 एसटी बसेस धावतात, या सर्व बसेसमध्ये या नवीन अॅपची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र सध्या या अॅपची सुविधा फक्त अधिकाऱ्यांनाच देण्यात आली आहे.MSRTC NEWS
तुमची एसटी कुठे आहे? एक क्लिक करा आणि स्थान मिळवा
मित्रांनो, सध्या हे अॅप्लिकेशन टेस्टिंग मोडमध्ये चालू आहे. म्हणजेच हे एप्लीकेशन व्यवस्थित चालत आहे की नाही. एसटी सध्या कोठे आहे आणि ॲप कशी माहिती देत आहे. याबद्दल टेस्ट सुरू आहे. ही टेस्ट झाल्यानंतर सर्व नागरिकांना ची माहिती अधिकृत संकेतस्थळावर देण्यात येईल. या ॲपचा नक्कीच सर्वसामान्यांना मोठा फायदा होणार आहे. तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तज्ञांकडून योग्य ते बदल केले जातील आणि हे ॲप सर्वसामान्यांसाठी प्रकाशित केले जाईल. Msrtc News
साधारणपणे, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुमची इच्छित एसटी कुठे थांबली आहे हे आपण आपल्या मोबाईलवर पाहू शकतो. यासोबतच अनेक प्रकारच्या सुविधाही या ॲपमध्ये देण्यात आल्या आहेत.
आता एसटीमध्येही तिकीट काढण्यासाठी अँड्रॉईड उपकरणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. मशिन कंपन्या आणि स्टेट बँक यांच्या सहकार्याने 5000 डिजिटल तिकीट मशिन्स वापरण्यात येणार आहेत. एटीएम, डेबिट कार्ड, फोन पे, गुगल पे, यूपीआय, क्यूआर कोड इत्यादी डिजिटल पेमेंट वापरून ऑनलाइन एसटीचे तिकिटे खरेदी केली जाऊ शकणार आहेत.MSRTC NEWS